सिंधुदुर्ग – राज्यत मोसमी पावसाला दमदार सुरुवात झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचे आगमन झाले आहे.पावसाच्या वेळेवरील आगमनाने बळीराजा सुखावला आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 220.4600 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 49.28टक्के भरले आहे.
जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 36.7800, अरुणा – 18.0175, कोर्ले- सातंडी – 20.0230 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.0354, नाधवडे – 1.8446, ओटाव – 1.4613, देंदोनवाडी – 0.2624, तरंदळे – 1.0300, आडेली – 0.00, आंबोली – 0.9020, चोरगेवाडी – 0.9810, हातेरी – 0.6550, माडखोल – 1.6900, निळेली – 0.4680, ओरोस बुद्रुक – 0.9120, सनमटेंब – 0.2130, तळेवाडी – डिगस – 0.00, दाभाचीवाडी – 0.6020, पावशी – 1.3610, शिरवल – 0.7780, पुळास – 0.7450, वाफोली – 0.4070, कारिवडे – 0.3910, धामापूर – 0.6460, हरकूळ – 1.1870, ओसरगाव – 0.0030, ओझरम – 0.4070, पोईप – 0.0690, शिरगाव – 0.2600, तिथवली – 0.5040, लोरे – 0.2490 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.