सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 लाख 92 हजार 998 जणांनी घेतला पहिला डोस

0
120

सिंधुदुर्ग –

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 92 हजार 998 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 445 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 908 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 263 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 94 हजार 170 व्यक्तींनी पहिला डोस तर 45 हजार 910 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

45 वर्षावरील 97 हजार 197 नागरिकांनी पहिला डोस तर 38 हजार 962 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 81 हजार 889 जणांनी पहिला डोस तर 11 हजार 529 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 4 लाख 3 हजार 107 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 4 लाख 640 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 82 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 18 हजार 160 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 86 हजार 155 कोविशिल्ड आणि 1 लाख 16 हजार 952 कोवॅक्सिन असे मिळून 4 लाख 3 हजार 107 डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 23 हजार 640 लसी उपलब्ध असून त्यापैकी 19 हजार 700 कोविशिल्डच्या आणि 3 हजार 940 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 300 लसी शिल्लक असून त्यापैकी 300 कोविशिल्ड आणि 0 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here