सिंधुदुर्ग – जिल्ह्यात 26 जुलैला उज्ज्वल भारत – उज्ज्वल भविष्य महोत्सवाचे आयोजन

0
53
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

ओरोस – प्रतिनिधी

आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात ऊर्जा मंत्रालय, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व इतर भागिदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या दि. 25 ते 30 जुलै 2022 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार दि.26 जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यान आले आहे. सिंधुदुर्ग येथे दि.26 जुलै रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सव कार्यक्रमास केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक हे उपस्थिती असणार आहेत. दुपारच्या सत्रात कणकवली येथे भगवती मंगल कार्यालयात दुपारी 3.00 वा. आयोजित कार्यक्रमास खासदार विनायक राऊत, आमदार निलेश राणे हे उपस्थिती असणार आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची उपस्थिती असेल. गत आठ वर्षातील केंद्र व राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या सौभाग्य, दीनदयाल ग्रामज्योती, एकात्मिक ऊर्जा विकास, मुख्यमंत्री सौर कृषिपंप, उच्चदाब वितरण प्रणाली, जिल्हा नियोजन व विकास समिती निधी इ. विविध योजनांच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रातील विकास कार्यक्रमाची जनजागृती महोत्सवात केली जाणार आहे. त्यासोबतच विविध योजनांच्या निवडक लाभार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमात केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here