सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 लाख 98 हजार 322 नागरिकांनी घेतला पहिला डोस

0
123

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 98 हजार 322 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 50 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 917 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 698 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

तसेच 60 वर्षावरील 1 लाख 23 हजार 593 व्यक्तींनी पहिला डोस तर 80 हजार 553 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 46 हजार 79 नागरिकांनी पहिला डोस तर 89 हजार 625 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 8 हजार 898 जणांनी पहिला डोस तर 75 हजार 275 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 7 लाख 60 हजार 523 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 7 लाख 74 हजार 180 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 5 लाख 90 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 84 हजार लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 5 लाख 90 हजार 997 कोविशिल्ड आणि 1 लाख 69 हजार 526 कोवॅक्सिन असे मिळून 7 लाख 60 हजार 523 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 61 हजार 580 लसी उपलब्ध असून त्यापैकी 42 हजार 140 कोविशिल्डच्या आणि 19 हजार 440 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 490 लसी शिल्लक असून त्यापैकी 440 कोविशिल्ड आणि 50 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here