राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटासह मुसळाधार पावसाचा तसेच विजी चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील चार दिवसात कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहेतरी त्या अनुषंगाने आवश्यकती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.