सिंधुदुर्ग: जिल्ह्यामध्ये 13 ते 30 सप्टेंबर 2022 च्या कालावधीत कुष्ठरुग्ण व सक्रिय क्षयरोग शोध मोहिम

0
45

ओरोस: केंद्र शासनच्य मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील 100 टक्के ग्रामीण व शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागामध्ये कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 13 ते 30 सप्टेंबर 2022 च्या कालावधीत मोहिम राबविण्यात येणार आहे. समाजातील सर्व स्तरावरिल व्यक्तींनी या मोहिमेदरम्यान आपल्या घरी येणाऱ्या पथकाकडून कुष्ठरोग व क्षयरोगाविषयी मोफत तपासणी करुन घ्यावी असे आवाहन आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहायक संचालक, डॉ. हर्षल आर. जाधव यांनी केले आहे.

संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमचे उद्देश पुढील प्रमाणे आहेत. समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे. नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहूविध औषधोपचाराखाली आणून संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. संशयित क्षयरुग्णांची थुंकी नमुने व एक्स रे तपासणी आवश्यकतेनुसार इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे. समाजात कुष्ठरोग व क्षयरोग विषयी जनजागृती करणे.

या मोहिमेचे सव्हेक्षण आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांचे मार्फत सर्व लोकांची शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. अशा दोन लोकांची एक याप्रमाणे 836 टीम व 171 पर्यवेक्षकांव्दारे एकुण 7,19,688 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील लोकांची गृहभेटीद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये घरोघरी पथकामार्फत कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. क्षयरोगाच्या बाबतीत टीबी आरोग्य साथी ॲप हे सर्वसामान्य लोकांसाठी तयार करण्यात आले ते सर्वांनी डाऊनलोड करावे असे आवहन ही पथकामार्फत करण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here