प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
आ.वैभव नाईक, संदेश पारकर यांनी अधिकारी पी. डी. पंदरकर यांना दिला इशारा
सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोलमाफी मिळेपर्यंत ओसरगाव येथील टोलनाका सुरु करण्यास शिवसेनेने विरोध केला असून ओसरगाव टोलनाका सूरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आज आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुन्हा ओसरगाव टोलनाक्यावर धडक दिली.याप्रसंगी टोलमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यक्षेत्र कोल्हापूरचे अधिकारी पी. डी. पंदरकर यांच्याशी आ. वैभव नाईक व संदेश पारकर यांनी दूरध्वनीवर संवाद साधताना जोपर्यंत सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी जाहीर केली जात नाही.महामार्ग संबंधित नागरिकांचे प्रश्न इतर समस्या मार्गी लागल्या जात नाहीत तोपर्यंत ओसरगाव येथील टोलनाका सुरु करण्यात येऊ नये अन्यथा होणाऱ्या परिणामांना आपणास सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, रामू विखाळे, राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर,ओसरगाव सरपंच प्रमोद कावले,वागदे सरपंच रुपेश आमडोस्कर, रिमेश चव्हाण,आदित्य सापळे, सिद्धेश राणे, योगेश मुंज, अजित काणेकर, गौरव हर्णे,रोहित राणे,मंगेश राणे, उत्तम लोके, सदानंद मोरे, नितीन धुरी, रवी ठाकूर, बाबू केणी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


