सिंधुदुर्ग – डाॅ. कुडाळकर हायस्कूलच्या वतीने नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षादिनानिमित्त सन्मान

0
21
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

देवबागशशांक कुमठेकर – श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉ. श्री.सी.कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळा मालवणच्या वतीने रक्षाबंधन उत्सवाचे निमित्ताने मालवण नगरपरीषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा शाळेच्या मुलांनी स्वतः तयार केलेल्या राख्या बांधून तसेच भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. भालचंद्र राऊत यांनी श्रीदेवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमास व्यासपीठावर संस्थेचे संचालक श्री. निवेकर, श्री. माडये, मेघा गावकर मॅडम, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. साटलकर मॅडम, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्राची परब मॅडम, श्री. शिंदे सर, श्री.आचार्य सर, श्री. नाईक सर, श्री. आठलेकर सर, सौ. शर्मिला गावकर मॅडम, सौ. साटम मॅडम, सौ.शिंदे मॅडम, सौ.गुळवे मॅडम ,सौ. आरोही गावकर मॅडम, सौ. पाटकर मॅडम, श्रीम प्रीती साटलकर, श्री. राठोड,श्री.खोत श्री.बाणे. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आचार्य सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here