प्रतिनिधी:संजय भाईप (सावंतवाडी)
डिंगणे गाळेल डोंगरपाल येथे वायरमन नसल्याने येथील गावांना विद्युत पुरवठा च्या अनेक समस्या होत आहेत वारंवार बांदा येथील कनिष्ठ अभियंत्यांकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचे आरोप मनसे बांदा विभागिय अध्यक्ष अंकुश उर्फ नाना सावंत यांनी केले आहे. या भागात कायमस्वरूपी वायरमनची नेमणूक करण्यात यावी यासाठी मनसेच्या वतीने सावंतवाडी उपविभागीय अभियंता भुरे यांना निवेदन देण्यात आले. त्याबाबत मनसेचे डिंगणी ग्रामपंचायत सदस्य आदेश सावंत व ग्रामस्थ यांच्या वतीने सावंतवाडी उपअभियंता भुरे यांना निवेदन दिले. यावेळी वायरमनची नेमणूक लवकर करण्यात येईल असे आश्वासन संबधित वरिष्ठ अधिकार्याकडून देण्यात आले.
यावेळी सावंतवाडी शहराध्यक्ष अशिष सुभेदार, बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे, संतोष भैरवकर,उपाध्यक्ष शुभम सावंत तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर, शाखाध्यक्ष निलेश मुळीक,सुरेंद्र कोठावळे, महाराष्ट्र सैनिक बाबू राउळ, मनोज कांबळी आदी उपस्थित होते. येत्या आठ दिवसात यावर तोडगा न काढल्यास मनसेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा कडक इशारा मनसेचे ग्रामपंचायत सदस्य आदेश सावंत यांनी दिला.


