सिंधुदुर्ग: तळगाव येथे खा.विनायक राऊत यांचा वाढदिवस आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

0
114

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

शिवसेना सचिव,तथा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत यांचा वाढदिवस आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला.केक कापून, पुष्पगुच्छ देऊन वाढिवसाच्या शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या. याप्रसंगी आ.वैभव नाईक यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

खा.विनायक राऊत यांनी कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती दिली. अशाच प्रकारे येत्या काळातही कोकणच्या विकासाला आपला हातभार लाभुदे. त्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत.अशा शब्दात आ. वैभव नाईक यांनी वाढिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते संदेश पारकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत,काका कुडाळकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर, सुशांत नाईक, मंदार केणी, यतीन खोत, संग्राम प्रभुगावकर, अमरसेन सावंत , राजन नाईक, बबन बोभाटे, मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, विकास कुडाळकर,अतुल बंगे, श्रेया परब, संतोष तारी,गीतेश राऊत, रुपेश पावसकर, हर्षद गावडे,छोटू पारकर,राजू गवंडे, आदीसह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here