वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर
वेंगुर्ला- दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाईच्या सप्ताहानिमित्त काढण्यात आलेल्या दिड्यांनी परिसर भक्तिमय बनला. टाळ-मृदंगांच्या गजराबरोबरच पौराणिक कथांवर आधारीत केलेल्या विविध वेशभूषा आकर्षण ठरल्या.
दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाई मंदिरात गेले सात दिवस अखंड विणा सप्ताह सुरु होता. या सात दिवसांच्या कालावधीत मंदिरात विविध मंडळांची संगीत व वारकरी भजनेही पार पडली. सप्ताहाच्या सातव्या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे दाभोसवाडा व विठ्ठलवाडी येथील भाविकांनी आपापल्या दिड्या ‘ज्ञानोबा तुकारामाच्या‘ जयघोषात विठ्ठलरखुमाई मंदिरात आणल्या. दोन्ही दिड्यांमधील भजनाने परिसरत भक्तिमय बनला होता. या दोन्ही दिड्यांमध्ये वारकरी वेशभूषा केलेले भजनी मंडळी आणि पौराणिक कथांवर आधारीत केलेले विविध वेशभूषा आदींचा समावेश होता. दिड्या मंदिरात येताच मोठ्या उत्साहात हरिनामाचा जयजयकार करण्यात आला.


