कुडाळ: देऊळवाडा,खेरवंद येथे पहिल्यांदाच देऊळवाडा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या जवळ आठवडा बाजार भरवण्यात आला. मंगळवार दिनांक २९/३ /२०२२ रोजी सकाळी या आठवडी बाजाराचा प्रारंभ करण्यात आला आणि इथून पुढे दर मंगळवारी आठवडी बाजार भरणार असा निर्धार ग्रामस्थांनी केला. या बाजाराला सर्व ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. हा आठवडा बाजार भरवण्यामध्ये सर्व देऊळवाडा ,खेरवंद ग्रामस्थांच मोलाचं सहकार्य लाभलं आहे,
आठवडा बाजार देऊळवाडा ,खेरवंद येथे भरवण्यामागचा उद्धेश सांगताना निलेश लाड,सौ. वर्षाराणी अभ्यंकर व ग्रामस्थ म्हणाले की, यामुळे स्थानिक शेतकरी,व्यापारी व इतर व्यापाऱ्यांच्या मालाला उठाव येईल. शिवाय सामान खरेदीसाठी ग्रामस्थांना शेजारील मोठ्या बाजारपेठेमध्ये जावे लागते. बाजार गावातच भरल्याने ग्रामस्थांना लांबवर जाण्यासाठी रिक्षा व इतर साधनांचा वापर करावा लागणार नसून त्यामुळे होणारा शारीरिक त्रास आणि पैशाचीही बचत होणार आहे असे खरेदीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी आपल्या भवनव्यक्त केल्या.
आजचा आठवडी बाजार गावात भरवल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी खूप समाधान व्यक्त केले. अजून अत्यावश्यक गरजेची अशी आणखीन काही दुकाने लावून हा बाजार कायमस्वरूपी चालू ठेवावा अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. आठवडी बाजार भरल्यामुळे ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी अत्यंत उत्साहात आपले सामान खरेदी करत व्यापाऱ्यांचे मनोबल वाढवले.
उपसरपंच-नरेश सावंत,सुधीर माळगावकर,अशोक,बागवे विठ्ठल लाकम ,दिलीप बागवे पत्रकार-अपराज बागवे,प्रदीप बागवे,रमेश मुळ्ये, सुरेखा परब,सुनीता परब,चिंतामणी बागवे,प्रभाकर हडकर,अशोक मसुरकर,चंद्रकांत राणे, प्रकाश बागवे,विनायक परब,संकेत परब,अजित परब,पोलीस पाटील -निवेश फर्नांडीस,सुशांत परब,उमेश परब,सुधाकर नातू,सुशांत परब,उमेश परब,मोहन आमडोसकर,गणपत परब,अनिल मेस्त्री,जमीनमालक-गंगाराम बागवे व कुटूंबीय,प्रसाद परब,प्रकाश परब,ज्युलि लोबो, अमोल परब,संतोष परब,बापूजी बागवे,अक्षय परब,सतीश परब,सुरेश परब,विजय परब तसेच अनेक ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते


