सिंधुदुर्ग: नदीच्या पात्रातील गाळ काढा अन्यथा आंदोलन: गणेशप्रसाद गवस

0
116

दोडामार्ग / सुमित दळवी
दोडामार्ग तालुक्याला गेली दोन वर्षे तिराळी नदीला येणाऱ्या पुरामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पुरामुळे तिराळी नदीत कुडासे वडाचे देवणे येथे भरपूर प्रमाणात गाळ साचल्याने नदीचे पाणी बागायती व शेतीत जात आहे. यामुळे शेती बागायतीचे अतोनात नुकसान होत असून संबधित तिराळी पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे, हा गाळ येत्या १५ मे पर्यंत न काढल्यास १६ मे रोजी तिराळी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दोडामार्ग शिवसेना तालुकप्रमुख गणेशप्रसाद गवस व शिवसेना पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता तिराळी पाटबंधारे विभाग यांना दिला आहे.

निवेदनाची प्रत आमदार दिपक केसरकर यांना देण्यात आली असून याकामी विशेष लक्ष घालून सदरचा गाळ त्वरित काढावा व शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे होत असलेले नुकसान टाळावे यासाठी तिराळी पाटबंधारे विभागाला आमदार दिपक केसरकर यांनी सूचना कराव्यात असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here