सिंधुदुर्ग: नवनिर्वाचित श्रावण सोसायटी चेअरमन दुलाजी परब व त्रिंबक सोसायटी चेअरमन श्रीकांत बागवे यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

0
88

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

श्रावण विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दुलाजी परब, व त्रिंबक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी श्रीकांत बागवे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल आज आमदार वैभव नाईक यांनी शाल ,श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. येत्या काळात सोसायटीसाठी जे काही सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी याप्रसंगी दिले. सोसायटीच्या वतीने देखील आ. वैभव नाईक यांचे स्वागत करण्यात आले.


याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, आडवली मालडी विभागप्रमुख बंडू चव्हाण,आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, सुभाष धुरी,श्रावण सोसायटी संचालक- वैशाली परब, रसिका मालप, गणेश चव्हाण, विजय गवळी, पळसंब येथे त्रिंबक सोसायटीचे व्हाईस चेअरमन रमेश परब, गणेश तोंडवकर, मंगेश गावकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, दादा गावकर, अनिल पुजारे, मधुकर कदम, पिंट्या सावंत, अविनाश परब आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here