सिंधुदुर्ग: नितेश राणेंचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

0
105
सिंधुदुर्गात सुरू होणार मत्स्य महाविद्यालय, आमदार नितेश राणे

सिंधुदुर्ग- आमदार नितेश राणेंनी शरणागती पत्कारल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. जामीन अर्जासाठी धावाधाव करत असताना आता त्यांचा कोठडीतील मुक्कामही वाढला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज (सोमवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलली आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारीला नितेश राणे यांची रवानगी कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली होती. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. नितेश राणेंच्या नियमित जामीनावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. पण मात्र आज सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यामुळे आजचे न्यायालयाचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या नियमित जामीनावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here