ओरोस: दरवर्षी जिल्ह्यात नेहरु युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येते. त्यामुळे नेहरु युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या जिल्ह्यातील युवक मंडळांनी कार्यालयास संपर्क साधून क्रीडा साहित्य वाटप करण्याचा फॉर्म भरुन द्यावा,असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यानी केले आहे.
युवक मंडळांना व क्रीडा मंडळ, महिला मंडळ यांनी क्रीडा साहित्याचा फॉर्म भरुन द्यावा. तसेच या फॉर्मवर क्रीडा साहित्यसाठी मंडळाचा शिक्का असणे आवश्यक आहे. ज्यांना नवीन मंडळ संस्थेशी संलग्न करावयाचे आहे त्यांच्या मंडळात कमीत कमी 7 सदस्य असावेत व त्या सदस्यांचे वय 15 ते 29 वर्ष असणे आवश्यक आहे.त्याशिवाय अध्यक्ष, उपअध्यक्ष व सचिव यांचे वय 18 ते 29 वर्ष असावे.मंडळ रजिस्टर किंवा अनरजिस्टर असले तरी चालेल परंतु सर्व सदस्यांचे आधार कार्ड व सर्व सदस्य एकाच गावाचे असावेत. ज्या संस्था, युवक मंडळांना क्रीडा साहित्य हवे आहे, त्यानी नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील कार्यालयाचा 02362295012 या क्रमांकावर 25 मे पर्यंत संपर्क करुन क्रीडा साहित्य वाटप फॉर्म भरुन द्यावा यामधून निवड झालेल्या मंडळाना क्रीडा साहित्य वाटप करण्यात येणार आहे