प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर
वेंगुर्ला– ज्ञानदानाच्या कार्यात आपण झिजण्याची पर्वा केली नाही. प्रामाणिकपणा, ज्ञानदान करण्याची तळमळ, शाळेविषयी असणारी निष्ठा आदी गुणांमुळेच आपण विद्यार्थीप्रिय अध्यापिका म्हणून प्रसिद्ध झालात असे गौरवोद्गार संस्थेचे चेअरमन विरेंद्र कामत-आडारकर यांनी उल्का वाळवेकर यांच्या निरोप समारंभाप्रसंगी काढले.
उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका उल्का वाळवेकर या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून ३० जून रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाला. श्री.कामत-आडारकर यांच्या हस्ते सौ.वाळवेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. सावळाराम कांबळी यांच्या हस्ते संस्था कार्यकारिणी सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, शिक्षक-पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी वर्ग यांच्या मार्फत सुवर्ण अंगठी तर संभाजी लोहार यांच्या हस्ते सौ.वाळवेकर यांना सन्मानपत्र प्रदान केले. तसेच सुजित चमणकर, गोविद मांजरेकर व अजित केरकर यांनी माजी विद्यार्थी संघाच्यावतीने सौ.वाळवेकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. कृपा म्हाडदळकर, नम्रता
कुर्ले, दिव्यता मसुरकर, राहूल वाळवेकर, जयप्रकाश चमणकर, सत्वशिला सातार्डेकर, कुबल, मोहिते, संभाजी लोहार, सावळाराम कांबळी यांनी शुभेच्छापर भाषणे केली.
यावेळी संस्थेचे विरेंद्र कामत-आडारकर, रमेश पिगुळकर, रमेश नरसुले, माजी मुख्याध्यापक सावळाराम कांबळी, संभाजी लोहार, मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, राधाकृष्ण मांजरेकर, निलेश मांजरेकर, सुनिल परब, इलियाज फर्नांडीस, वैभव खानोलकर, रेखा पडवळ, मनाली कुबल, बोडेकर आदी उपस्थित होते.
मी प्रामाणिकपणे, तळमळीने मिळेल ते काम केले. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत या शाळेचा मोलाचा वाटा असल्याचे उद्गार सत्काराला उत्तर देताना उल्का वाळवेकर यांनी काढले.
फोटोओळी – संस्थेचे चेअरमन विरेंद्र कामत-आडारकर यांच्या हस्ते उल्का वाळवेकर यांचा निरोप समारंभप्रसंगी सत्कार करण्यात आला.


