प्रतिनिधी:सुमित दळवी
दोडामार्ग: गोव्यातून बेळगाव दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या कारला पाळये तिठा येथे अपघात झाला.सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत दोडामार्ग पोलीस स्थानकात कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की बेळगाव येथील युवक कारमधून गोवा येथे गेले होते.आज दुपारी परत जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कारची जोरदार धडक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला बसली.या अपघातात कारच्या दर्शन भागाचे मोठे नुकसान झाले आहे.