सिंधुदुर्ग: पर्यटन क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्गात

0
71
स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके - आदित्य ठाकरे

शिवसेना,युवासेनेच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे सुशांत नाईक यांचे आवाहन

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राची पाहणी करणे व पर्यटन वाढीबाबत उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्री व सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे आज २१ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.दुपारी १ वाजता चिपी विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे.

तसेच तारकर्ली येथे दुपारी ०२ वाजता सिंधुदुर्गातील अत्याधुनिक स्कुबा बोटीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पर्यटन जिल्ह्यात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आदित्य ठाकरे यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जलक्रीडा प्रकार, समुद्र किनाऱ्यांचा विकास, कृषी,जल व इतर पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

याप्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत,आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर व जिल्ह्यातील शिवसेना नेते उपस्थित राहणार आहेत.तरी शिवसेना,युवासेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक यांनी आज २१ फेब्रुवारी रोजी चिपी विमानतळ येथे उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले आहे.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here