कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा युवासेनेच्या मदन राणे यांनी दिला होता इशारा…
दोडामार्ग – दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दोन ते तीन दिवसं पाऊसाने मुसंडी मारली होती.काही गावातील नदी नाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.विजघर येथे पाण्याचा प्रवाह थेट रस्त्यावर आल्याने बाजुचा रस्ता पुर्णपणे वाहुन गेला होता तसेचे रस्त्यालगत असलेली झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता याची कल्पना संबंधित विभागाला दिली असता संबंधित विभागाकडून त्याठिकाणी कानाडोळा करण्यात येत असल्याचे चित्र निदर्शनास आल्याने युवासेना तालुका प्रमुख मदन राणे यांनी दोन दिवसात वाहुन गेलेल्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरल न लावल्यास कार्यालयात घेराव घातला जाईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.याची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाकडून वाहुन गेलेल्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरल लावण्यात आल्याने संबंधित विभागाबाबत स्थानिक ग्रामस्थ तसेच युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे यांच्यावतने समाधान व्यक्त केले


