सिंधुदुर्ग – मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनासाठी मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत ठेक्याने देण्यात येणाऱ्या 15 हेक्टर पेक्षा कमी नसलेल्या सर्व जलाशयात, ज्या जलाशयांची पाण्याची वर्भर किमान 8 मीटर पेक्षा जास्त सरासरी खोली असेल असे जलाशय, एकूण जलाशयाच्या 1 टक्के जलक्षेत्रामध्ये परवानगी देण्यात येणार आहे.
सर्व जलाशयांकरिता पिंजरा उभारणी संख्या कमाल 18 पिजंरे, 630 चौ.मी. जलक्षेत्र प्रति वैयक्तिक मत्स्यसंवर्धक तसेच मत्स्यसंवर्धक सहकारी संस्था, महिला स्वयं सहायता गट, मच्छिमार स्वयं सहायता गट, संयुक्त दाईत्व गट असल्यास पिंजरा उभारणी संख्या 6 पिजंरे प्रती सदस्य या प्रमाणात कमाल 72 पिंजरे, 2 हजार 520 चौ.मी. जलक्षेत्र या प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करण्यास इच्छुक असलेल्या सभासदांनी, मत्स्यकास्तकारांनी दि. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मालवण यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन र.ग.मालवणकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांनी केले आहे


