वेंगुर्ला प्रतिनिधी – गणेश चतुर्थी काळात वाहतुकीचे उत्तम नियोजन करणा-या पोलिसांचा वेंगुर्ला युथ संस्था व लोकराज्य मंचच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यामध्ये पोलिस अंमलदार मनोज परुळेकर, पोलिस हवालदार रुपाली वेंगुर्लेकर, उषा शिरोडकर, संतोषी सावंत यांचा समावेश आहे. यावेळी पोलिस निरिक्षक अतुल जाधव, पोलिस शांतता समिती सदस्य डॉ.श्रीनिवास गावडे, लोकराज्यमंच प्रमुख शिवराम आरोलकर, पोलिस कर्मचारी व युथ संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फटोओळी – वाहतुकीचे उत्तम नियोजन करणा-या पोलिसांचा डॉ.श्रीनिवास गावडे यांनी सत्कार केला.


