सिंधुदुर्ग : हरिश्चंद्र साटेलकर यांच्या प्रसंगावधानामुळे शाळकरी मुलाचा वाचला जीव

0
17

वेंगुर्ला प्रतिनिधी- परबवाडा गावातील हरिश्चंद्र साटेलकर यांच्या प्रसंगावधानामुळे पाण्यात बुडत असलेल्या मुलाचा जीव वाचला. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे परबवाडा गावाच्यावतीने साटेलकर यांचा सत्कार करण्यात आला.

 परबवाडा-गवंडेवाडा येथे भाड्याने राहत असलेल्या पहिलीत शिकणारा मुलगा आंबेखण पाण्यात बुडत होता. त्यावेळी परबवाडा-मासुरा वाडीतील हरिश्चंद्र राघोबा साटेलकर हे त्या मार्गाने कुडाळ येथे जात होते. अचानक तो मुलगा बुडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लागलीच त्यांनी पाण्यात उतरुन त्या मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसामुळे जीवित हानी वाचली. साटेलकर यांच्या प्रसंगवधानाची गावाने दखल घेत त्यांचा सत्कार केला.

यावेळी सरपंच पपू परब, उपसरपंच हेमंत गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, संजय माळगांवकर, सामाजिक कार्यकर्ते मनवेल फर्नांडीस, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, माजी उपसरपंच विश्वास पवार, समिर चिदरकर, सायमन आल्मेडा, अजित गवंडे, डॉ.बाळू गवंडे, अनिल गवंडे, किशोर गवंडे, शशी गवंडे, दुवाट फर्नांडीस, एरोन फर्नांडीस आदी उपस्थित होते.

फोटोओळी – मुलाला वाचविणारे हरिश्चंद्र साटेलकर यांचा परबवाडा गावातर्फे सत्कार करण्यात आला.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here