सिंधुदुर्ग: प्लास्टिक निर्मुलनासाठी माविम व उमेद यांच्या महिला बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचा पर्याय

0
130

ओरोस: एकल वापराच्या प्लास्टिक निर्मुलनासाठी माविम व उमेद यांच्या महिला बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचा पर्याय देवून प्रयत्न करावेत. ज्या नगरपालिकांकडे बेलिंग मशीन नाहीत अशांनी प्रस्ताव द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.

पर्यावरण व हवामान बदल विभाग मंत्रालयाच्यावतीने निर्णयानुसार एकल वापर प्लास्टिक निर्मुलनासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय कार्यदल समितीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) विनायक ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, प्र. जिल्हा प्रशासन अधिकारी जयंत जावडेकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे यांनी स्वागत प्रास्ताविकामध्ये शासन निर्णयाची संपूर्ण माहिती दिली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, व्यापारी असोसिएशन, हॉटेल संघटना, घाऊक व्यापारी, यांची एकत्रिक बैठक घेऊन कृती आराखडा तयार करावा. तालुकास्तरावर ग्राम पंचायतींचे क्लस्टर करुन प्लास्टिक गोळा करावा त्याचबरोबर त्याच पृथ:करण करावेत. ज्या ग्रामपंचायतींकडे बेलिंग मशीन आहे त्याचा वापर करण्याबाबत सूचना द्यावी. स्वच्छ भारत मिशन, माझी वसुंधरा या योजनांचीही जोड द्यावी. तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांनी नगरपालिकांचे मुख्याअधिकारी यांनी समन्वयन ठेवून प्लास्टिक निर्मुलनाबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी असे सांगून सविस्तर आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here