सिंधुदुर्ग :केंद्र आणि राज्य शासनाने कृषी माळ धोरण लागू केले असून राज्यात जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात कक्षाची स्थापना १५ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी जी आय मानांकनासाठी उस्फूर्तपणे प्रतिसाद घ्यावा असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहा संचालक यांनी केले आहे.
राज्यात विविध भागांमध्ये उत्कृष्ट दर्जाची फळे व भाजीपाला यांचे उत्पादन घेतले जाते.कोकण विभागात हापूस आंब्याच्या विशिष्ट चवीमुळे त्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.फलोत्पादन विभागा तर्फे राबविण्यात आलेल्या विशिष्ट फळबाग लागवड योजनेमुळे संपूर्ण राज्यात व कोकणात फळबागांखालील क्षेत्र मोठ्याप्रमाणात वाढले आहे.त्यामुळे भौगोलिक मानांकन चिन्हांकन नोंदणीस विशेष महत्व प्राप्त झाले आहे.युरोपिअन आणि पाश्चिमात्य देशात भौगोलिक चिन्हांकन नोंदणीस विशेष महत्व प्राप्त झाले आहे.युरोपिअन आणि पाश्चिमात्य देशात भौगोलिक चिन्हांकनाचा दरजा असलेल्या पिकास व मालास ग्राहकांची जास्त पसंती असते.
जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी या मानांकित जी.आय पिकांचे अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणीसाठी तालुकास्तरावर कृषी सहाय्यक,कृषिपर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ही मोहीम शनिवार दिनांक २० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. तरी याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आ