संजय भाईप (सावंतवाडी )
बांदा – दोडामार्ग रस्त्यावर डेगवे- बाजारवाडी येथे विलास केसरकर यांच्या दुकानासमोर आयचर टेम्पो बाजुपट्टीवरील मातीत रुतला.सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली.सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.या दोन्ही बाजुपट्टी पावसाळ्यात कमकुवत झाल्या असून वारंवार अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या बाजुपट्टीचे काम स्थानिक प्रशासनाने व्यवस्थित करणे.असे आवाहन प्रवाशी व नागरिक करत आहेत.


