प्रतिनिधी- संजय भाईप (सावंतवाडी)
बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात श्रावण महिन्यात होणाऱ्या श्रीरामनाम जपास भाविकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहेे. पुर्वापार चालत आलेली ही परंपरा बांद्यात मोठ्या भक्तीभावाने आचरली जाते. श्री विठ्ठल मंदिरात दररोज सायंकाळी 7 वाजता सायंआरती होते.
दरवर्षी श्रावण महिन्यात या आरतीनंतर जपाला प्रारंभ होतो.यावेळी श्रीराम जयराम जयजय राम या पावन नाममंत्राचा पाच माळा जप केला जातो. यामध्ये अबालवृद्ध भाविक नित्यनेमाने सहभागी होतात. संपुर्ण श्रावण महिना हा उपक्रम सुरु असतो.


