सिंधुदुर्ग: बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या दीक्षा तोंडवळकर हिचा आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार

0
77

प्रतिनिधी – पांडुशेट साठम

कुडाळ: बारावी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली वेंगुर्ले खर्डेकर ज्युनिअर कॉलेजची विज्ञान शाखेची विद्यार्थीनी दीक्षा सुमंत तोंडवळकर (गुण ९६.५०टक्के) हिच्या वेरळ येथील निवासस्थानी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देत शाल श्रीफळ देऊन सत्कार करत तिचे अभिनंदन केले.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी दीक्षाचे वडील सुमंत तोंडवळकर, आई सौ.समीक्षा तोंडवळकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बंडू चव्हाण, विजय पालव,अमित भोगले,दीपक आंगणे, राहुल सावंत, वेरळ सरपंच आनंदी परब,आबा परब, श्रीकृष्ण पाटकर ,बबन पोयरेकर,विश्वास तोंडवळकर, अनिल तोंडवळकर,अविनाश मुणगेकर, अशोक गोलतकर, रवींद्र पोयरेकर, मनीषा कवठणकर आदींसह वेरळ मुणगेकर वाडी येथील ग्रामस्थ होते.

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here