भाजप आमदार नितेश राणेंना 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या हल्लाप्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली होती.त्यांनतर आ.नितेश राणें कणकवली कोर्टात शरण आले होते. त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे यांचे वकील आज सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला.
आ.नितेश राणे यांना हृदयविकाराच्या तीव्र त्रासाने कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविले गेले.जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला आहे.