प्रतिनिधी
वेंगुर्ला – अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील आसोली गावचे अनंत आसोलकर यांची जिल्हा उपाध्यक्ष व म्हापण ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद चव्हाण यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल भाजप वेंगुर्लाच्यावतीने जिल्हा चिटणीस निलेश सामंत व जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपाचे सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, प्रशांत खानोलकर, विजय ठाकूर, नाथा मडवळ, प्रविण ठाकूर, अनंत म्हापणकर, संदिप खोत, संजोग परब, राजू पावसकर, उपेंद्र रावले, सुदेश केनवडेकर, चंद्रकांत चव्हाण, विष्णू फणसेकर, रामचंद्र कोचरेकर, जगदीश म्हापणकर, प्रदीप गवंडे, रोहन प्रभू, पांडुरंग शिवलकर, नंदकिशोर पालकर, दत्ताराम राणे आदी उपस्थित होते.