सिंधुदुर्ग : भात खरेदी बोनसची रक्कम जाहीर करावी;आ. वैभव नाईक यांची विधानसभा अधिवेशनात मागणी

0
163

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

मुंबई: सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर देण्यात आला मात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. त्याबाबत आज विधानसभा अधिवेशनात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले. लवकरात लवकर शेतकऱ्यांना बोनसची रक्कम जाहीर करण्याची मागणी वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी केली.

शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेल्या भाताची खरेदी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी भात खरेदी केंद्रे निश्चित करून यावर्षी देखील उच्चांकी भात खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर मिळवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भाताला दर वाढवून देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. गतवर्षी त्यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या भाताला वाढीव दर व बोनस रक्कम देखील देण्यात आली. गतवर्षी पेक्षा जास्त दर यावर्षी देण्यात आला मात्र बोनसची रक्कम जाहीर करण्यात आली नसल्याने आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात आज त्याबाबत प्रश्न उपस्थित करत बोनसची रक्कम जाहीर करण्याची मागणी केली.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here