सिंधुदुर्ग : मसुरे देऊळवाडा मंदिरानजीक महिला दिनाचा कार्यक्रम दिमाखात संपन्न!

0
184

मसुरे देऊळवाडा मंदिरानजीक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन सौ.वर्षाराणी अभ्यंकर यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केले होते.यामध्ये गीतगायन,पाककला,रांगोळीसपर्धा,केशभुषा,होममिनिस्टर यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.या गटाची स्थापनाही सौ.वर्षाराणी अभ्यंकर यांनीच केली आहे. या भागातील महिलांनी उस्फूर्तपणे स्पर्धेत भाग घेतला होता.

नियोजनबद्ध कार्यक्रमाचे कौतुक ऐकताना या गटाच्या प्रमुख सौ.वर्षाराणी अभ्यंकर यांनी आपण या महिलांच्या गटाची स्थापना का केली आणि यासाठी आजही अडचणी येत असतानाही आपले प्रयत्न अथक कसे चालू आहेत याबद्दल माहिती सांगितली. माहिती देताना त्या म्हणाल्या,’मी एक धेय्य डोळ्यासमोर ठेऊन या गटाची स्थापना केली होती. या गावातील महिलांच्या अंगभूत सुप्त गुणांना चालना देत एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं,संसारासाठी रात्रंदिवस राबताना स्वतःतील गुणकौशल्याकडे दुर्लक्ष,डोळेझाक केलेल्या या महिलांना स्वतःची एक ओळख मिळवून देण, त्यांच्यातील प्रचंड उर्जेला योग्य त्या मार्गात प्रवाहित करणं,त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण,यासारख्या अनेक चांगली उद्दिष्टे आणि शुद्ध भावनेने व विचारांनी त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली.गावांतील महिलांनीही त्यांच्या या प्रयत्नांना साथ दिली.सुरुवातीला आर्थिक पाठबळ कुणाचं नव्हतं,अगदी आताही नाही. पण या सर्व महिला प्रत्येकी 100 रु.काढतात.शिवाय देणगीदार दात्यांच्या मदतीने पहिलं वर्ष उत्तम पार पडलं.असा करता करता आज तिसरं वर्ष उजाडला आहे!

गट स्थापन करताना अभ्यंकर मॅडम म्हणाल्या,’ कुठल्याही गोष्टीची सुरुवात निर्हेतुक, शुद्ध भावनेने प्रामाणिकपणे केलेली असेल, शिवाय ते सर्वसमावेशक कार्य असेल तर त्याला एक भव्यदिव्यत्व प्राप्त होतं. हा सुखसोहळा अनुभवताना कित्येक दिवस त्यात हरखून जायला होतं. कारण त्यामागची साधना, घेतलेली जीवतोड मेहनत, सोसलेले चटके व त्यातून झालेल्या जखमा लपवत आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणं ही खरीच तारेवरची कसरत….! मोठेपणा आणि समाधान हे कधीच मागून मिळत नाही त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत संपूर्ण समर्पण भावनेने सिद्ध होऊन त्या परिस्थितीला सामोरं जाणं हेच त्यावेळचं शहाणपण असतं… कुठलही कार्य म्हटलं की त्यात अडीअडचणी संकट ही बहुतेक करून येतात. त्यावेळी डोकं शांत ठेवत निर्णायक भूमिकेत राहून समतोल साधत, खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करत लक्ष केंद्रित केलं तर यश नक्कीच आपलंच दार ठोठावत.. .! याचा प्रत्यय मला बरेच वेळा आलाय आजही आला. निमित्त होतं 8 मार्च जागतिक महिला दिनाच! हा दिन आमच्या मसुरे देऊळवाडा गावात साजरा करणं.!’

या गटाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.अगदी कोरोनाच्या काळातही यात खंड पडला नाही.यावर्षी कोरोनाचा तडाखा थोडं कमी झाला होता.त्यामुळे महिला दिन उत्साहात साजरा करायचा असं गटाच्या सगळ्या महिलांनी ठरवलं. त्यामुळे महिला दिनी त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं.आर्थिक टंचाई तर होतीच.म्हणतात ना प्रयत्नांना यश हमखास मिळतेच त्याप्रमाणे काही व्यक्तींना आर्थिक समस्या सांगून त्यांना मदतीच आव्हान केलं ते आमची तळमळ पाहतच होते आणि त्याक्षणी ते देवासारखे उभे राहिले. प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी दिली. शिवाय महिलांच्या बरोबरीने ग्रामस्थ पुरुष तरुणमंडळी आम्हाला धीर देत सर्वतोपरी मदतीसाठी पुढे सरसावली.

यावेळी मला अनपेक्षित अशा अनेक आव्हानांना, परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असा सांगत वेर्षाराणी मॅडम म्हणाल्या ,’अचानक 8 मार्चचा ठरलेला कार्यक्रम रद्द करावा लागला. स्वतःची तब्येत अत्यंत नाजूक असतानाही नेहमीच मानसिक धीर देणारी, सगळ्यांच मनापासून कौतुक करणारी आमची एक काकू अचानक वारली. या कार्यक्रमाला ती आवर्जून येणार होती. त्यानंतर अडथळ्यांची मालिका थांबायचं नावच घेईना. एखाद्या कार्यक्रमाच आयोजन, नियोजन, संयोजन करताना समर्थपणे सगळ्या परिस्थितीवर मात करत डोकं शांत ठेऊन वावरणं, खरंच म्हणावं तेवढं सोपं नाही..”जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण” हे खरंच आहे. याहीपेक्षा अनेक दिव्यातून मला जावं लागलं,अनेक समस्या प्रश्न, अनुत्तरित उत्तर सगळ्याच बाजूने परीक्षेचा काळ! आपलेच दात नी आपलेच ओठही ! मग न्याय कोणाकडे आणि कसा मागायचा..? म्हणतात ना, ‘कधीही झाकलेली मूठ सव्वालाखाची असते ते काही खोटं नाही..!’ पण वेळकाळ व परिस्थितीने आलेलं शहाणपण माणसाला आयुष्यभराची शिदोरी देऊन जात. माणसातले विविध रंग आणि संग जवळून पाहायला अनुभवायला मिळतात. त्यावेळचा पश्चाताप मनाला निर्णायक भूमिकेपर्यंत पोहोचवतो.

पण आपला हेतू, प्रयत्न, विचार, सातत्य प्रामाणिकपणा तळमळ खरी असेल व परिस्थितीला न हरता सामोरं गेलं तर सगळ्या गोष्टी मूळ आकार घेतात. तेव्हा त्यातली सुंदरता, यशस्विता तो अत्यानंद, स्वानन्द मनाला हर्षित करतो व आपल्याबरोबर इतरांनाही या आनंदमय गंगेत स्नान करण्याच सद्भाग्य मिळवून देतो. एकीकडे राग, द्वेष, मत्सर आकसापोटी घेतलेले निर्णय व केलेली कृती आणि त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत आपण कसे खंबीरपणे जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहिलो हे याची देही याची डोळा तो भगवंत आणि सगळेच बघतच असतात..!असे आपल्या अनुभवाचे कथन करत असताना त्या पुढे म्हणाल्या ,’मांजरीला वाटतं आपल्याला कोणी बघत नाही पण तिचा हा तिने करून घेतलेला गोड गैरसमज, भ्रम असतो”

त्यामुळे मला एवढच वाटतं, परिस्थिती कितीही टोकाची आली तरी खचून न जाता समोरच्याला उदार अंतःकरणाने माफ करता आलं पाहिजे. तेही अगदी मनापासून..! .कारण वरून केलेले लेपन एक ना एक दिवस निघतच.म्हणूनच सत्कार्य करताना हे सगळं गृहीत धरून केलं तर केवळ मागेपुढे राहतो तो आनंद, सुख आणि समाधान आणि महत्त्वाचा एकसंघपणा, एकत्रीकरण व खऱ्याअर्थी सबलीकरण मग ते क्षेत्र अनुभूती कुठल्याही बाबतीत असो, आनंद देत घेत भरभरून जगता आलं त्याने जग जिंकलं,जगण्यातली सार्थकता मिळाली मग अजून काय शिल्लक राहत ? आपल्या मनातील भावना आणि गावांतील महिलांप्रति असलेली तळमळ अभ्यंकर मॅडमनी व्यक्त केली .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संयोजन करताना त्यांनी सर्व मान्यवर,वक्ते,श्रोते,पत्रकार बंधू,ग्रामस्थ,जागामालक, देणगीदार, डेकोरेटर्स, स्पर्धक,ज्यांनी ज्यांनी यात आपला कार्यक्रम समजून समर्पणभावनेने सहभाग घेतला त्या सर्वांची ऋणी आहे…राहीन..! यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here