ओरोस: सर्व माजी सैनिक इसीएचएस सभासदांना कळविण्यात येते की मेडिकल ऑफिसर, डॉ चेतना चुबे यांचा वैद्यकीय कारणास्तव सुट्टीवर असल्याने ओपीडी बंद राहणार आहे. त्यामुळे औषधे देण्यात येणार नाहीत. औषधे हवी असल्यास सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करुन नंतर इसीएचएस मध्ये आल्यास सरकारी दवाखान्यात न मिळालेली औषधे दिली जातील. इमर्जन्सी मध्ये रेफरल पत्र देण्यात येईल. डॉक्टर कामावर हजर झाल्याची सूचना सभासदांना व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून कळविले जाईल.
अद्यापपर्यंत इसीएचएसच्या व्हाट्सॲपच्या स्पर्श ग्रुप मध्ये सामील झाले नसल्यास 9422937171 या मोबाईल नंबरवर सभासदांनी आपला इसीएचएस चे कार्ड चा फोटो टाकावा. असे आवाहन, प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे ईसीएचएस पॉलिक्लिनिकच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी केले आहे.

