माध्यमिक विद्यालय माड्याची वाडीचा मार्च २०२२ चा निकाल १००टक्के लागला. विद्यालयातून मार्च २०२२ ला ४४ विद्यार्थी बसले होते.सर्व विद्यार्थी पास होऊन प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला.
कुमारी.प्राची महेश गावडे हिने ८९.२०% गुण घेऊन विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर कुमारी.सानिया सत्यवान परब ८९.००% गुण घेऊन दुसरी आली,तर कुमार. राघू नवलु झोरे ८८.८० % गुण तिसरा आला.सर्व विद्यार्थांचे संस्थाचालक, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक श्री आर.डब्लू.ठाकूर यांनी अभिनंदन केले.


