प्रतिनिधी : सुरेश कोलगेकर
वेंगुर्ला- वेंगुर्ले शहर दाभोली नाका येथे आज रविवारी सायकाळी 5 वाजण्याच्या सुमारास (एम.एच ०२ ए.वाय.८५८०) मारुती सुझुकी झेन कारने दाभोली नाका येथे अचानक पेट घेतला.यावेळी गुरु ठाकूर नामक चालक व त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पडल्याने अनर्थ टळला.मात्र गाडीने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी येथील नागरिकांनी धावपळ केली.
आग विझविण्यासाठी पाईपच्या साहाय्याने पाणी मारून, वाळू टाकून, बादलीमधे पाणी घेवून तसेच छोट्या अग्निशमन सिलेंडरचा वापर करून आग आटोक्यात आणली. यावेळी विश्वास पवार,उदय दाभोलकर,भाऊ कुबल तसेच बी.पी डेव्हलपरचे कामगार व स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.


