सिंधुदुर्ग- मालवणात उद्या भव्य पाककला स्पर्धा

0
165

ओवन, मिक्सर, इलेक्ट्रिक किटली अशा आकर्षक बक्षिसांची खैरात;स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे मालवण नगरपरिषदेचे आवाहन

मालवण– मालवण नगरपरिषद व डीपीडीसीच्या माध्यमातून मालवण दांडी बीच येथे आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवात भव्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक १३ मे २०२२ रोजी सायंकाळी ०४ वाजता दांडी बीच येथे हि पाककला स्पर्धा संपन्न होणार आहे. यामध्ये प्रथम तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. विजेत्यांना ओवन , मिक्सर, इलेक्ट्रिक किटली अशा आकर्षक बक्षिसांची खैरात करण्यात येणार आहे. आमदार वैभव नाईक यांनी या स्पर्धेचे प्रायोजकत्व केले आहे.

स्पर्धेच्या माध्यमातून महिलांमधील स्वयंपाक कलेला व्यासपीठ उपलब्ध करून कलेला वाव देण्याच्या उद्देशाने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी मालवण तालुक्यातील व शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा.

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मिथुन सिगले-८३२९३६२८८३,पूनम चव्हाण-७५८८८५९६७५ / ९६९९४६४७३२, सेजल परब-९४०५५३२७८४, यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here