संजय भाईप/सावंतवाडी
सावंतवाडी – सांस्क्रुतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या येथील स्पदंन यूथ फाउंडेशनतर्फे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सावंतवाडी तालुक्यातील सांस्क्रुतीक चळवळीच्या विकासासाठी आपण सदैव तयार असल्याची प्रतिक्रीया युवराज लखमराजे यांनी दिली.
यावेळी यूथ फांउडेशनचे संस्थापक सिध्देश महाजन,तेजस परब,केदार कणबर्गी, गोविंद प्रभु,अभिषेक देऊलकर, प्रशांत परब आदि ऊपस्थीत होते. श्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन युवराजाना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


