प्रतिनिधी -संजय भाईप
सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्या वतीने एप्रिल २०२२मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कनिष्का राजन केणी व किमया संतोष परब या दोन्ही विद्यार्थीनींनी राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेत सुयश प्राप्त करुन शिष्यवृत्ती, मेडल व प्रमाणपत्रधारक होण्याचा मान मिळवला आहे.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य व सिंधूदुर्ग जिल्हा गणित मंडळ यांच्या वतीने गणित सुबोध ,गणित प्रावीण्य व गणित प्रज्ञा या परीक्षेचे इयत्ता पाचवी व आठवीसाठी आयोजन करण्यात येते. सुबोध व प्राविण्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना प्रज्ञा या राज्यस्तरीय पलीक्षेला बसण्याची संधी प्राप्त होते. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक जे.डी.पाटील ,सरोज नाईक ,उर्मिला मोर्ये , रसिका मालवणकर, लुईजा गोल्सलवीस ,रंगनाथ परब,शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,वंदना शितोळे , प्राजक्ता पाटील,शितल गवस ,प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
गणित विषयासंबधी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या राज्यस्तरीय परीक्षेत बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर , उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर , सरपंच अक्रम खान ,केंद्रप्रमुख संदीप गवस,विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर,गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले असून शाळेच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.