सिंधुदुर्ग: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा दि. 5 ऑगस्ट पासून

0
44
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

ओरोस: सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दि. 5 ऑगस्ट 2022 ते दि.20 ऑगस्ट 2022 या कालाधीत ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी -2022 ची परीक्षा दि. 9, 15, 16, व 19 ऑगस्ट 2022 हे 4 दिवस वगळून सकाळी 7.30 ते सायं 6.45 या वेळेत, एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली. एम.आय.टी. एम. कॉलेज,सुकळवाड ,सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्टेशन जवळ ता. मालवण या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here