प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
रायगड- रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पुल आजपासुन पुन्हा बंद करण्यात आला आहे. गतवर्षी आंबेतचा हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावेळी पुलाचे कॉलम, पुलाचे कॉलम आणि स्लॅबमधील बेरींग आदी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यानंतर पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच पुलाचे पिलर पश्चिमेकडे झुकले असल्याचे निदर्शनास आल्याने हा पुल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा जवळचा पूल बंद झाल्याने येथील रहिवाशी आणि पर्यटकांचे हाल होणार आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीतील दापोली, मंडणगड व खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आंबेत पूल धोकादायक बनल्याने दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते.