सिंधुदुर्ग : रोटरी क्लब ऑफ बांदा आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

0
152

संजय भाईप/सावंतवाडी
सावंतवाडी:रोटरी क्लब बांदा आयोजित व व्हिजन आरएक्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे संपन्न झाले. या शिबिरास डॉ.लिपसा उडवाडिया त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी विनय भंडारी ,डॉ.दिपाली,डॉ.प्रिया व मनस्वी यांनी रुग्ण तपासणी केली.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बांदाचे प्रेसिडेंट मंदार कल्याणकर, रो.प्रमोदजी कामत, रो.डॉ.जगदीश पाटील, एजी रो.राजेशजी घाटवल, जीएसआर रो.आनंद रासम रो.ऍड.सिद्धार्थ भांबुरे त्याचप्रमाणे सेक्रेटरी रो.फिरोज खान खजिनदार रो.बाबा काणेकर व बांदा रोटरीचा सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत मंदार कल्याणकर यांनी केले प्रास्ताविक डॉक्टर जगदीश पाटील यांनी मांडले व आभार प्रमोद कामत यांनी मांडले.

बांदा रोटरी क्लब यापुढेही असे समाजपयोगी कार्यक्रम करत राहील असे प्रेसिडेंट मंदार कल्याणकर यांनी यावेळी सांगितले. या शिबिराचा सुमारे 380 लोकांनी लाभ घेतला त्यात साधारणपणे मोतीबिंदू असलेले 25 रुग्ण सापडले व बाकी रुग्णांना मोफत चष्मे पुढील काही दिवसात प्राप्त होतील. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रोटरीच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल असे आमचे ऐजी रो.राजेशजी घाटवळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here