वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कौलगेकर
रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथी कॉलेज वेंगुर्ला यांचा पदग्रहण सोहळा पदग्रहण अधिकारी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह निकेत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सिंधुदुर्ग झोनच्या झेड.आर.आर.पदी दुर्गेश पाटील, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी प्रितीश लाड, सचिवपदी निकीता निनावे, रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथी कॉलेज वेंगुर्ल्याच्या अध्यक्षपदी सर्जिल कर्जिकर तर सचिवपदी अलिशा खान व कोमल जगाडे यांची नियुक्ती करण्यात आली. या सोहळ्यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथी कॉलेजच्या ‘आधार‘ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. राजेश घाटवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एज्युकेअर‘ ह्या उपक्रमाचे उद्घाटन गरजू मुलांना वह्यांचे वाटप करुन करण्यात आले. तसेच श्वेता हुले यांचा ‘वेटलँड चॅम्पियन्स‘ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात सिंधुदुर्ग झोनमधील सर्व रोटरॅक्ट क्लबसाठी झोनल ओरिएंटेशनचे आयोजन केले होते.
यावेळी पी.एच.एफ., पी.डी.आर.आर., साहिल गांधी, पी.डी. आर.ऋषिकेश जाधव, आय.पी.डी.आर.विशाखा पेडणेकर, डी.सी.सी.राजेश घाटवळ तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे रोटरॅक्ट्रर्स यांच्यासह डिस्ट्रिक्ट ३१७० चे हर्ष, पिथ्यूश दोशी, शुभम जाधव, चैतन्य निळकंठान्वर, नरेन आदी उपस्थित होते.
फोटो – प्रितीश लाड


