सिंधुदुर्ग: “लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा मग धरण पुर्ण करा”- धरणग्रस्थांची मागणी

0
100

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

कणकवली: हरकूळ येथील धरण प्रकल्पाचे ८० % काम पूर्ण झाले असतानाही ग्रामस्थांच्या वहिवाटेचा रास्ता बंद करण्याचे कारस्थान प्रशासन असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.धरणग्रस्थांच्या पुनर्वसनाचा पत्ता नाही तरीही जबरदस्तीने धरणाचे काम चालू आहे. आता पर्यंत धरणाचे ८०% काम होत आले आहे. लोकांच्या फक्त २०% मागण्या पुर्ण झाल्या असून अजून ८०% मागण्या बाकी आहेत. असे असतानाही बळाचा वापर करून रहदारीचा रस्ताही बंद करण्याचे कारस्थान प्रशासन करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी विनंती केली आहे की, प्रशासन जो पर्यंत पुर्नरवसनाचा प्रश्न सोडवत नाही तो पर्यंत रस्ता बंद करू नये. धरणाचे २०% काम शिल्लक ठेवावे.असे असताना कणकवली नायब तहसिलदार नरवडे यांनी धरणावर जाऊन शासकीय कामात अडथळा आणत आहात अशी धमकी दिली आहे. त्याशिवाय प्रकल्पग्रस्थांनवर केसेस घालत आहेत. कारण नसताना ठेकेदाराला सामील होऊन वातावरण बिघडवीत आहेत. त्यामुळे लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा मग धरण पुर्ण करा अशी मागणी धरणग्रस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here