मौजे आंबोली वनपरिक्षेत्रात वन्यहत्ती वन्यप्राण्यांमूळे शेतपिकांचे अथवा इतर नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी असे नुकसान झाल्यास नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई प्रकरणे मंजुरीसाठी वनपरिक्षेत्र कार्यालय आंबोली येथे संपर्क साधावा असे आवाहन सावंतवाडीचे उपवनसंरक्षक डी.पी खाडे व आंबोलीचे वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी केले आहे. यामुळे नुकसान भरपाई प्रकरणे मंजुरीसाठी तात्काळ पाठविणे सोईचे होईल. तरी गावातील ग्रामस्थांनी आपली स्वत:ची काळजी घ्यावी तसेच सर्तक राहण्याचे आवाहन सावंतवाडीचे उपवनसंरक्षक डी.पी खाडे व आंबोलीचे वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी केले आहे.
वनपरिक्षेत्र कार्यालय आंबोली संपर्क क्रमांक जॉन्सन रॉडिसोजा वनपाल, आंबोली 9420462096, पाडुरंग द. गाडेकर वनरक्षक नांगरतास 8275266574, पुजा दि. देवकुळे वनरक्षक फाटकवाडी 9403784722, ज्ञानेश्वर कृ. गावडे वनमजूर आंबोली ,9403071837 या क्रमांकावर संपर्क करावा.
मौजे आंबोली वनपरिक्षेत्रातील आंबोली परिमंडळामधील नांगरतास, फाटकवाडी या नियतक्षेत्रामध्ये वन्यहत्ती एक टस्क्रर या वन्यप्राण्यांचा वावर गेले 7 ते 8 दिवस वाढलेला आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थ यांचे शेतातील पिक व ऊस यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी करीत आहे. गावातील व आजुबाजुच्या परिसरात वन्यप्राणी यांनी शेतपिकाचे नुकसान करु नये यासाठी शेतात मचाण करुन त्यावर रात्री शेतपिकाचे सरंक्षण करण्यात येते त्यामुळे या सर्व ग्रामस्थांना वन्यहत्ती या क्षेत्रात आहे तोपर्यंत रात्रीसंरक्षण कामी मचाणावर जावु नये . तसेच कोणत्याही व्यक्तीने हत्ती जवळ जावु नये अथवा त्यांला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करु नये. सायंकाळ नंतर शेतात काम करणे टाळावे. हत्तीचा वावर ज्या क्षेत्रात आहे. तेथे रात्रीचा प्रवास करु नये, सायंकाळ नंतर आवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. हत्ती जवळ जावुन मोबाईल व कॅमेराव्दारे फोटो काढण्यास जावु नये. असे आवाहन वन्यहत्तीचा वावर आहे तेथील ग्रामस्थाना करण्यात येत आहे.
तसेच वन्यहत्तीचा वावर असलेल्या क्षेत्रात वन कर्मचारी यांच्या टिम तयार करुन वन्यहत्ती याला मानवीवस्ती पासुन दुर ठेवण्यासाठी रात्री गस्त घालत आहेत. शेतपिकांचे व ऊसपिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होवु नये यासाठी रात्री गस्त कर्मचाऱ्या मार्फत वन्य हत्तीला दुर ठेवण्याचा प्रयत्न कर्मचारी यांचे मार्फत चालु आहेत.


