सिंधुदुर्ग: विजयदुर्ग बंदरात पर्ससीनचे जाळे असलेल्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

0
181
मासेमारी
पावसाळी हंगामामुळे खोल समुद्रातील मासेमारी १ जूनपासून बंद

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

देवगड- परवाना ट्रॉलिंगचा आणि जाळे पर्ससीनचे अशा पध्दतीने रत्नागिरी येथील मुसा अब्दुल्ला या मच्छिनारी नौकेला विजयदूर्ग बंदरासमोरील ८ वावांमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी सकाळी पकडले.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल या गस्तीनौकेद्वारे परवाना अधिकारी मालवणकर आणि सागरसुरक्षा रक्षक समुद्रात गस्त घालत असताना रविवारी सकाळी विजयदूर्ग बंदरासमोरील ८ वावांमध्ये रत्नागिरी येथील मुजाहीर अब्दूल रेहमान होडेकर यांच्या मालकीची मुसा अब्दुल्ला ही नौका उभी होती.यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाने चौकशी केली असता इंजिन बेल्ट बदलण्यासाठी नौका उभी ठेवल्याचे तांडेल यांनी सांगीतले.
नौकेची तपासणी केली असता ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना नौकेवर पर्ससीन जाळी आढळून आली. नौकेवरील २० खलाशांपैकी फक्त ८ खलाशांचा विमा उतरविलेला आढळून आला.यामुळे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत कलम १५ नुसार कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here