प्रतिनिधी-दोडामार्ग / सुमित दळवी
दोडामार्ग तालुक्यात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा लक्षात घेता येत्या चार दिवसात योग्य त्या उपाय योजना करून अंमलात आणाव्यात, अन्यथा सेना स्टाईलने आंदोलन करू,असा इशारा युवा सेनेचे तालुका प्रमुख मदन राणे यांनी दोडामार्ग वीजवितरण विभागाला दिला आहे.
तीव्र उन्हाळा आणि वारंवार होणार खंडित वीजपुरवठा याने अगोदरच दोडामार्गवासीय हैराण झाले आहेत.एक बाजूला पाहावं तर खंडित वीजपुरवठा असूनही भरमसाठ वीज बिले येत आहेत. तर विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी काहीच नियोजन नाहीत. त्यामुळे वारंवार होणारा विजेचा खेळखंडोबा सुधारा,अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील असे निवेदन राणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.


