श्री राम नवमी महोत्सव विठ्ठल मंदिर कालवी बंदर येथे भजन, किर्तन, नाट्य रसिकांना नामीपर्वणी
प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
वेंगुर्ले – नवतरुण उत्साही कला क्रीडा मंडळ ,कालवी बंदर श्री विठ्ठल रखुमाई उत्सव कमिटी व ग्रामस्थ कालवी बंदर त्यांच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ह. भ .प. गणू बुवा पराडकर यांचे परंपरेने चालत आलेला श्री राम नवमी महोत्सव विठ्ठल मंदिर कालवी बंदर येथे शनिवार दिनांक दोन एप्रिल ते रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ या कालावधीत संपन्न होत आहे .या उत्सहात सामाजिक नाट्यस्पर्धा भजने कीर्तने हनुमान जन्म अशा विविध प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
दिनांक २ एप्रिल ते रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ या कालावधीत सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेखा पुढील प्रमाणे राहील.
उत्सव काळात रोज पहाटे श्रींची षोडशोपचार पुजा एकादशी आरती तीर्थप्रसाद, रोज दुपारी ग्रंथवाचन रोज सायंकाळी धुपारती हरिपाठ त्याचबरोबर रोज रात्री नऊ ते दहा या वेळेस ग्रामस्थांची भजने, उत्साहाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी दिनांक २ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री देव ब्राह्मण प्रासादिक वारकरी भजन मंडळ मोबारवाडी केळूस यांचे भजन .
नाट्य स्पर्धेचे उद्घाटन रात्री ९.३०वाजता रात्रौ ठीक १०.००वाजता – ओमकार मित्र मंडळ नेरूळ वाघचौडी निर्मित व प्रभाकर सादये पुरस्कृत सामाजिक नाटक “चांडाळ चौकडी, याचे लेखक दिग्दर्शक भास्कर सोनु गावडे आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दिनांक ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता श्री ब्राह्मण प्रसादिक भजन मंडळ परुळे यांचे भजन आणि रात्री ठीक दहा वाजता सिद्धांत फाऊंडेशन सिंधुदुर्ग निर्मित श्री रवींद्र आरावकर भटजी आंदुर्ले पुरस्कृत सामाजिक नाटक महाशुन्य या नाटकाचे लेखक राजेंद्र पोळ असून दिग्दर्शन स्वानंद सामंत यांनी केले आहे . सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता ह-भ-प मकरंद देसाई यांचे सुश्राव्य किर्तन सायंकाळी ७.३० वाजता श्री गजानन प्रसादिक भजन मंडळ आंदुर्ले यांचे भजन आणि रात्री ठीक १०.०० वाजता गोपाळकृष्ण विभाग तळाशील निर्मित व प्रा प्रदीप होडावडेकर तेंडोली पुरस्कृत सामाजिक नाटक खरं सांगायचं तर हा नाट्यप्रयोग सादर होईल या नाटकाचे लेखक आहेत उदय नारकर व दिग्दर्शक आहेत भास्कर गायकवाड . मंगळवार दिनांक ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३०वाजता श्री सिद्धेश्वर प्रसादिक भजन मंडळ मुंगी यांचे भजन व रात्री ठीक १०.०० वाजता .प्रांजल संतोष केरकर कालवी पुरस्कृत लेखक व दिग्दर्शक साईनाथ सदानंद नेरूरकर वक्रतुंदा थिएटर निर्मित सामाजिक नाटक डावी बाजू नाट्यप्रयोग सादर होईल . बुधवार दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी ७.००वाजता रात्री १०.०० वाजता जीवनदायी विकास संस्था वेंगुर्ले ,दादा केळूसकर नवबाग वेंगुर्ले पुरस्कृत सामाजिक नाटक बोगनवेल याचे लेखक आहेत प्रसाद खानोकर. गुरुवार दिनांक ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ .००वाजता ह-भ-प ज् श्री स्नेहलदीप सामंत वालावल यांचे सुश्राव्य किर्तन सायंकाळी ७.३० वाजता श्रीदेवी आंदुर्लेई प्रसादिक भजन मंडळ आंदुर्ले यांचे भजन रात्रौ ठिक १०.००वाजता शरद उर्फ आनंद मोबारकर पुरस्कृत दत्ता पवार लिखीत संतोष सागळे दिग्दर्शित श्री देवी सातेरी प्रासादिक तरूण कला क्रिडा मंडळ कवठी यांचे सामाजिक नाटक डॉक्टर तुम्हीसुद्धा हा नाट्यप्रयोग सादर होईल शुक्रवार दिनांक ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४.००वाजता ह.भ.प. अवधूत नाईक वायंगणी यांचे सुश्राव्य किर्तन होईल सायंकाळी ७.३०वाजता श्री देवी तारा देवी भजन मंडळ केळुस यांचे भजन १०.०० वाजता अक्षर सिंधू कला मंच सिंधुदुर्ग निर्मित नीलेश सामंत वेतोबा पेट्रोल पंप परुळे पुरस्कृत सामाजिक नाटक कायापालट त्याचे लेखक आहेत विजय चव्हाण तर दिग्दर्शन केलय सुहास वरूनकर यांनी शनिवार दिनांक ९ एप्रिल रोजी सायंकाळी ४.००वाजता हरिपाठ विलास रेवणकर मुंणगी रात्रौ ८.००वाजता पाटील बंधू कापडोस यांचे सुश्राव्य गायन रात्री १०.००वाजता ग्रामस्थांचे भजन-कीर्तन ह.भ.प. उत्तम बुवा केळुसकर यांचे हनुमान जन्मावर आधारित सुश्राव्य किर्तन होईल रात्री १२.००वाजता हनुमान जन्म श्रींची पालखीतून मिरवणूक तीर्थप्रसाद उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे राम नवमी दिनांक १० एप्रिल 2022 रोजी सकाळी ८.००ते १०.०० वाजेपर्यंत ओटी भरण्याचा कार्यक्रम सकाळी १०ते १२ वाजेपर्यंत ग्रामस्थांची भजने श्रीराम जन्मावर आधारित श्री उत्तम बुवा केळुस्कर यांचे वारकरी कीर्तन दुपारी १२.००वाजता श्रीराम जन्म दिडकर कुटुंबीयांच्या हस्ते नंतर श्रींची ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक होईल. तीर्थ महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी ५.००वाजता महापुरुष वारकरी भजन मंडळ निवत्ती यांचे भजन सायंकाळी ६.३० वाजता श्री विठ्ठल रखुमाई सन्मित्र वारकरी भजन मंडळ यांचे भजन रात्री ७.००वाजता ग्रामस्थांचे भजन पालखी मिरवणूक रात्री १०.००वाजता सामाजिक नाट्य स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण माननीय श्री.निलेश सामंत. माजी शिक्षण व आरोग्य सभापती यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर रात्रौ.११.०० वाजता. श्रीगौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळ दाभोली यांचा दणदणीत पौराणिक नाट्यप्रयोग सादर होईल विशेष आकर्षण कल्वी बंदर रंगमंचावर प्रथमच महिला पखवाजवादक हे खास आकर्षण आणि हार्मोनियम प्रल्हाद हळदणकर यांचे राहील. त्यानंतर पहाटे काकड आरतीने या उत्सवाची सांगता होईल.