वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधिकारी, अंमलदार व पोलिस कर्मचारी १७ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सावानिमित्त १५ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी श्रीसत्यनारायणाची महापूजा, दुपारी महाप्रसाद व रात्रौ ८ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी दुपारी महाप्रसाद व सायंकाळी मिरवणूकीने गणपतीचे मांडवी खाडी येथे विसर्जन केले जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.


