सिंधुदुर्ग: वैभववाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा व रक्तदात्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

0
39
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधी: वैभववाडी: मंदार चोरगे

भारतातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका रिया आवळेकर यांना करण्यात आले सन्मानित

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, राजेश पडवळ ट्रस्ट वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला सन्मान
वैभववाडी:मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेल्या रिया आवळेकर यांनी देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान मिळवला त्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने राजेश मो.पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने वैभववाडी येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाभवे वैभववाडी नगरपंचायत व बौद्ध सेवा संघाच्या वतीने देखील रिया आवळेकर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला रिया आवळेकर यांच्या गुरुवर्य मयुरी आवळेकर, अक्षता आवळेकर देखील उपस्थित होत्या. आपल्याला शैक्षणिक सेवेमध्ये कार्यरत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्या प्रशासनाने मोलाचे सहकार्य केल्याचे रिया आवळेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. आपल्या शाळेतील विद्यार्थी व पालक यांचे देखील तितकेच प्रेम व सहकार्य लाभल्यामुळेच आज मी सर्व बंधने झुगारून शैक्षणिक कार्यात यशस्वी होऊ शकले असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. रिया आवळेकर आपल्या संघर्षाची गाथा मनोगतातून व्यक्त करत असताना संपूर्ण सभागृहात शांतता पसरली होती.या कार्यक्रमाला रिया आवळेकर यांच्या गुरुवर्य मयुरी आवळेकर उपस्थित होत्या आज पहिल्यांदाच आम्ही गुरू व शिष्य एकाच व्यासपीठावर उपस्थित आहोत. त्यामुळे हा गुरू समोर झालेला माझा सन्मान विशेष असल्याचे रीया आवळेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी पुणे येथे जाऊन रक्तदान केलेल्या तेजस साळुंखे, महेश कदम, प्रशांत लाड, डॉ.युवराज निकम, प्रशांत ढवण, शेखर रावराणे, संजय गुरखे, गोपाळ सावंत या रक्तदात्यांचा देखील सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा पातळीवर रक्तदान चळवळीत सक्रिय सहभागी असलेले सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, बाबली गवंडे, महेश राऊळ, यशवंत गावडे यासर्व मान्यवरांचा देखील शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेल्या एस.बी.शिंदे सर यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अनेक स्पर्धा परीक्षा तसेच स्पर्धांमध्ये जिल्हा पातळीवर उज्वल यश संपादन केलेल्या भक्ती पाटील, सायली जांभवडेकर,अमृता भैराळे, वेदांत सरकटे, ओम शिंदे, मृणाल सरकटे, सायना जाधव, जिज्ञासा कांबळे, गंधर्व कांबळी, आयुष नाळे,मंथन ठोंबरे , अथर्व साबळे, श्रेया शेळके, दुर्वांक शेळके या विद्यार्थ्यांचा देखील सन्मानपत्र देऊन गौरव यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाभवे वैभववाडी चे उपनगराध्यक्ष संजय सावंत, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एस.बी. शिंदे, ट्रस्ट चे सल्लागार डॉ.राजेंद्र पाताडे, ट्रस्ट च्या विश्वस्त तसेच माजी महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, तृतीयपंथी शासकीय शिक्षिका रिया आवळेकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, राजेश पडवळ ट्रस्ट चे अध्यक्ष राजेश पडवळ, नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, ट्रस्ट चे सल्लागार डॉ.राजेंद्र पाताडे, ट्रस्ट विश्वस्त व माजी महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एस बी शिंदे, विजय रावराणे, विश्राम रावराणे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे संजय शेळके, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भास्कर नादकर, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे शरद कांबळे, सत्कारमूर्ती रिया आवळेकर, मयुरी आवळेकर, अक्षता आवळेकर, तसेच वैभववाडी तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव मंदार चोरगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here