प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
वैभववाडी- वैभववाडी तालुक्यातील अरूणा प्रकल्पाच्या बांधकामात माजी भाजपाचे मंत्री गिरीष महाजन यांच्या ६०० कोटीच्या भ्रष्टाचारामुळे २०१८ पासुन सुमारे १3० घरे पाण्याखाली होती. पाणी सोडायला लावल्यामुळे बुडीत घरे दिसत असुनही तहसिलदार , प्रांत , तत्कालीन कलेक्टर पांढर पट्टे , अधिक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता या सर्वांनी एकही घर बुडालेले नाही असा धडधडीत खोटा अहवाल देणाऱ्यांचे पितळ ऊघड झाले.
त्या घरांची मा पुनर्वसन मंत्री श्री विजय वडट्टीवार ,महसुल मंत्री मा ना बाळासाहेब थोरात यांचे सुचनेवरुन वस्तुनिष्ठ पाहणी केली.यावेळी प्रकल्प बाधितांच्या सोबत अशोकराव जाधव जेष्ट काँगेस नेते आणि अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य , विश्वनाथ किल्लेदार सरचिटणीस शेतकरी कष्टकरी संघटना महा राज्य सोबत तानाजी कांबळे , अजय नागप , व इतर महिला, पुरुष प्रकल्पग्रस्थ यांनी पाहणी केली.


